बंधारा अभियान’ ; ग्रामपंचायतीच्या उपक्रमास प्रतिसाद
मालवण, ता. १५ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुकळवाड ग्रामपंचायत आणि अभियान समितीने जलसंधारणाचे एक मोठे पाऊल उचलले आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. परब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १४) सुकळवाड गावात ‘बंधारा अभियान’ यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
एकाच दिवशी तब्बल पाच महत्त्वाच्या ठिकाणी बंधारे बांधण्याची ही मोहीम ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून साकार झाली. सुकळवाड बाजारपेठ, मच्छी मार्केट ओव्हर ब्रिज नजीक, सुनील पालकर गिरणनजीक ओढ्यावर, पाताडेवाडी, (कै.) राजू पाताडे यांच्या शेतानजीक असणाऱ्या ओढ्यावर, पाताडेवाडी स्मशानभूमी नजीक असणाऱ्या ओढ्यावर, पाताडेवाडी येथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीनजीक बंधारे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधले.
या अभियानामुळे सुकळवाड गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनाही मोठा फायदा होणार आहे. या जलसंधारणाच्या कामामुळे बागायत शेतीला उपयोग होणार असून, उन्हाळी भात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढून भूजलसाठा वाढण्यास मदत मिळणार आहे. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास हातभार लागणार आहे.
सुकळवाडचे प्रभारी सरपंच किशोर पेडणेकर यांचे परिश्रम व उत्साहवर्धक प्रेरणेतूनच हे बंधारे बांधण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, पंचायत समिती मालवण विस्तार अधिकारी श्री. परब, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिसपाटील लक्ष्मण काळसेकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी सरपंच प्रकाश पावसकर यांच्यासह रूपेश गरुड, संतोष बिलये, हेमंतकुमार पाताडे, निखिल काळसेकर, पंढरी पाताडे, पंकज पाताडे, सूरज चव्हाण, उमेश पाताडे, किरण पालकर, प्रकाश वराडकर, अनिल पालकर, सुनील पालकर, संतोष सावंत, संदीप धामापूरकर, मधुराज पाताडे, भरत पाताडे सहभागी झाले.









![]()