भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘आपल्याकडे जे जास्त आहे ते दुसऱ्याला द्यावे’ या उदात्त भावनेतून आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने, सुकळवाड (ता. मालवण) येथे “माणुसकीची भिंत” हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान समिती सदस्य आणि सुकळवाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आज २८ मार्च रोजी सुकळवाड एसटी स्टँड येथे उत्साहात संपन्न झाले.
आपल्या घरातील अनावश्यक वस्तू—जसे की जुने पण सुस्थितीतले कपडे, चपला, मुलांची खेळणी—या वस्तू गरजूंना मिळाव्यात आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, या सामाजिक जाणिवेने ही ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. “तुमच्याकडे जे जास्त आहे ते येथे द्या आणि ज्याला गरज आहे त्यांनी ते येथून घेऊन जा,” असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गावातील अनेक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रभारी सरपंच किशोर पेडणेकर , माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती उपसभापती प्रसाद मोरजकर, माजी सरपंच प्रकाश पावसकर, माजी उपसरपंच स्वप्नील गावडे, हेमंतकुमार पाताडे, अनिल काळसेकर, माजी सदस्य सागर कुशे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वेदिका गोसावी, कर्मचारी अक्षय पाताडे, केंद्रचालक रुपाली बिलये आणि सफाई कर्मचारी सुभाष म्हसकर, रिक्षा युनियन अध्यक्ष सुनील आयरे, ग्रामस्थ संतोष म्हाडेश्वर, राकेश वराडकर, अमोल राऊळ, राजन पेडणेकर, अजय मयेकर, संतोष सावंत व इतर सुकळवाड ग्रामस्थ उपस्थित होते.
![]()