मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत आज सुकळवाड ग्रामसचिवालय कार्यालयात नवीन वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. “माणूस आणि पुस्तक यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे” या उदात्त हेतूने हे वाचनालय ग्रामस्थांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्रभारी सरपंच किशोर पेडणेकर यांच्या हस्ते माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे , माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य जानकी पावसकर, वृषाली गरुड, समिती सदस्य सागर कुशे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पाताडे, मुख्याध्यापक श्री. नांदोसकर, समिती सदस्य हेमंतकुमार पाताडे, प्रदीप पाताडे, पंढरी पाताडे, किरण पाताडे, ग्रामस्थ सौ. धामापूरकर, भुषण पाताडे उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती संजना कुशे, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, केंद्रचालक रुपाली बिलये, सफाई कर्मचारी सुभाष म्हसकर व ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वेदिका गोसावी यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली

![]()