सुकळवाडमध्ये मंदिरे चकाचक; ग्रामपंचायतीचा उपक्रम
मालवण, ता. १५ : मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सुकळवाड ग्रामपंचायतीतर्फे मंदिर परिसर स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील प्रमुख मंदिर परिसरांची साफसफाई केली. यात नागरिकांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
सुकळवाड बाजारपेठ हनुमान मंदिर, श्री देव ब्राह्मण मंदिर, सुकळवाड पाताडेवाडी श्री देवी भवानी मंदिर आदी देवालयांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच युवराज गरूड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पाताडे, माजी सरपंच प्रकाश पावसकर, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, डाटा एंट्री ऑपरेटर रूपाली बिलये, ग्रामरोजगार सेवक प्रदीप पाताडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष म्हसकर यांच्यासह हेमंतकुमार पाताडे, सिद्धेश पावसकर, रुपेश गरूड, बाळा पावसकर, पंढरी पाताडे, सिद्धेश पेडणेकर, सुभाष टेंबुलकर, सुनील पालकर, अनिल पालकर, अशोक पाताडे, सुनील पाताडे, उमेश पाताडे, सुभाष चव्हाण आदी सहभागी झाले होते.
यावेळी मंदिर परिसरातील कचरा, गवत व अनावश्यक वस्तूंची सफाई केली. मंदिर परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवल्याने या धार्मिक स्थळांना अधिक पावित्र्य प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छता आणि सामुदायिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत होत असल्याचे मत सरपंच गरूड यांनी व्यक्त केले. स्वच्छता मोहिमेमुळे सुकळवाड गावातील सामाजिक एकीचे दर्शन झाले असून अशा उपक्रमांमुळे गावपातळीवर स्वच्छता राखण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचेही ते म्हणाले.
![]()