सुकळवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग हे गाव कसाळ मालवण हमरस्त्यावर सिंधुदुर्ग नगरीच्या जवळ असून गावाचे आराध्य दैवत ‘श्री ब्राह्मणदेव’ आहे. हे देवस्थान एक प्राचीन व जागृत देवस्थान आहे. कोणीही मानकरी नसल्याने म्हणूनच कोणीही भक्ताने स्वतः: मागणे मांडून श्री ब्राह्मण देवाचे स्मरण केले तरी देव पावतो अशी आपली सर्वांची या देवावर प्रचंड श्रद्धा असून घरात कोणीही व्यक्ती आजारी पडली, काही संकट आले तरी देवाजवळ उभे राहून आपण जिथे असू तिथून थेट श्री ब्राह्मण देवाची प्रार्थना केल्यावर सर्व संकटे दूर होतात अशी या देवावर आपली सुकळवाड पंचक्रोशीतील लोकांची श्रद्धा आहे.
या देवस्थानची व्यवस्था श्री देव ब्राह्मण सेवा समिती सुकळवाड ही संस्था पाहते. दरवर्षी सत्यनारायण महापूजा, त्यानिमित्त दशावतार नाट्यमहोत्सव, श्रावण सोमवारी भजन-कीर्तन स्वरूपात चालणारा हरिनाम जागर, समाजाराधना, मार्गशीर्ष वद्य द्वितीयेला वार्षिक जत्रोत्सव त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय मल्लखांब, गट्ट्यांचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच आरोग्य, महिला, शेतकरी, उद्योग, शिबिरे, रक्तदान, नेत्र तपासणी इत्यादी धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम राबविले जातात.
![]()