श्री यशवंत महाराजांचा जन्म एका दत्तभक्त कुटुंबात १३ सप्टेंबर १८१५ ला पुण्यात ओंकार वाड्यात झाला. त्यांचे मूळ गाव भोसे पंढरपूर, तालुका जिल्हा सोलापूर. त्यांचा जन्म अश्वलायन शाखेच्या कश्यप गोत्री ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती. ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करीत असत प. पू. देव मामलेदार १८ व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात.
श्री यशवंत राव महाराज यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गोरगरीब, निराधार महिला व मुलेे आजारी व व्याधीग्रस्त यांना मदत कारताना आपले सर्व आयुष्य वेचले. त्या सर्वांना ते आपले कुटुंबियाच मानीत असत. इ. स. १८२९ ते १८७२ तब्बल ४३ वर्षे महसूल खात्यात विविध पदावर नोकरी केली. त्यांनी महाराष्ट्राचे विविध भागात नोकरी केली.
इ. स. १८७०-१८७१ महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला. माणसे व जनावरे अन्नांन्न करून मृत्युमुखी पडत होती. श्री यशवंत महाराज त्यावेळी बाळगणं तालुक्यात तहसीलदार होते. गरीब व वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व सर्व रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली. पण दुष्काळ स्थिती पाहता हि रक्कम अगदीच कमी होती. हे देव मामालेदारांना जाणवले, ते तालुका तहसीलदार होते. त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरिबांमध्ये वाटून टाकली. हि रक्कम थोडी नव्हती, ती होती १२७००० त्याकाळी. हि वार्ता त्यांचे वारिष्टाना कळली व ते ट्रेझरीत तपासणीस आले. आणि काय अभिनव घडले? तपासणीत सर्व रक्कम ट्रेझरितच मिळाली. एक पैशाचाही फरक मिळाला नाही. या ठिकाणी भगवंताने चमत्कार तर केलाच पण भगवान महाविष्णूनी यशवंत महाराजांना साक्षात दर्शन दिले. बाळगणं तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसील दाराला देवत्व बहाल केले व तेव्हापासून यशवंत महाराज देव मामलेदार याच नावाने ओळखले जाऊ लागले.

श्री देव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांचे चरित्रात आढळतो. श्री देव मामलेदार यांनी हा मर्त्यदेह २७-१२-१८८७ रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला. या महान दत्तभक्ताचा समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण ११. त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे. येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त या विदेही दत्तभक्तांचे समाधी दर्शनास येतात. हा सोहळा १५ दिवस चालतो. यशवंत महाराजांचे कृपेने त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. सटाणा हे देव मामालेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळेच त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे. भक्तांनी या स्थानी जाऊन श्रींचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा

श्री सद्गुरू सिताराम उर्फ बाबा मयेकर
श्री सिताराम उर्फ बाबा मयेकर सुकळवाड हे व्यवसायाने चित्रकार प. पु . श्री देवमामलेदार यांचे शिष्य यांनी सुकळवाड येथे श्री देवमामलेदार यांच्या पादुकांची स्थापना १८८७ मधे आपण वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी केली.
![]()